चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची भावना जोपासायला हवी. ग्राम स्वच्छता, परिसर स्वच्छता याबरोबरच अंतर्मनाच्या स्वच्छतेचे ही महत्त्व आहे. एकता, शिस्त, व अनुशासन यांचे पालन केले पाहिजे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्तीचा व शिस्तीचा संस्कार करण्यासाठीच राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू केला. दैनंदिन जीवनात श्रमाचा संस्कार अत्यंत आवश्यक आहे. "असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेश घोरपडे यांनी केले.
ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. व्ही. के. गावडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आजवर अनेक समाज विकासाची मोठी कामे पार पडली. या योजनेचे विद्यार्थी स्वावलंबी असतात. त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजलेला असतो. अशा आत्मविश्वास संपन्न युवकांच्या माध्यमातूनच देशाची प्रगती होईल." असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक प्रा. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. भूषण गावडे व जेनिफर डिसूजा यांनी सूत्रसंचालन केले. सानिका गोडसे हिने आभार मानले. मेघा हळवणकर, स्वाती गावडे, विक्रम कांबळे, नामदेव चांदेकर, भावना बाळाप्पा या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment