मनोरूग्नांच्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पहा - आशिष कांबळी - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

मनोरूग्नांच्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पहा - आशिष कांबळी


यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागातर्फे एन. एस. एस. राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         समाजातील अंध, अपंग, मुकबधीर , मनोरूग्न, गोर - गरीब, दारिद्रयाने ग्रासलेले लोकांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दया, क्षमा, सहानुभुती, प्रेम दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. म्हणूनच' जीवन आनंद' संस्था सामाजिक कार्याचा वारसा घेऊन कार्यरत आहे. त्या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करा असे भावनिक आव्हान मुंबई येथील जीवन आनंद संस्थेचे व्यवस्थापक आशिष कांबळे यानी केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागातर्फे'' 'राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा"कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे होते.

               प्रारंभी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेव्दारा शासनाच्या व विद्यापीठ स्तरीय विविध उपक्रमात सहभागी होता येते. विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय शिबीरांमध्ये सहभागी होता येते अशी माहिती दिली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. डॉ. ए. पी. गवळी, प्रा. पी. ए. पाटील, प्रा. एस. डी. तावदारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचलन कु. माधुरी सुतार यांनी केले. या प्रसंगी इंद्रायणी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विविध कँप बद्दल व सिलेक्शन पध्दतीबद्दल माहिती दिली. प्रा. पी. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एन. एस. एस. चे महत्व व ग्रेडेशन बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार कु. ममता राऊत यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment