प्रा. प्रकाश बोकडे यांना आदर्श पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

प्रा. प्रकाश बोकडे यांना आदर्श पुरस्कार प्रदान

 

प्रा. प्रकाश बोकडे यांना आदर्श पुरस्कार प्रदान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        डुक्करवाडी (रामपूर) येथील बी. ड़ी. विद्यालय व ज्युनि. कॉलेज बागिलगेचे उपक्रमशील शिक्षक सहकार विषयाचे तज्ज्ञ प्रा. प्रकाश जोतिबा बोकडे याना उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबध्दल कोल्हापूर येथील स्पीड न्यूज २४ या चॅनेल मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या हस्ते माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्री. टोणपे, संपादक राजा माने, चॅनेल संपादक सुहास पाटील  यांच्या उपस्थितीत हा आदर्श शिक्षक पुरस्कर प्रदान करण्यात आला . 

      विद्यार्थ्याच्यासाठी नेहमी  झगडणारे, धडपडणारे, त्यांचे हित पहाणारे, त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे, प्रा. बोकडे यांना यापूर्वीही कृतीशील प्राध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक अभ्यासक्रम महामंडळामध्ये सहकार विषयाचे पेपर सेटर माझे काम केले आहे.

No comments:

Post a Comment