हलकर्णी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्रॅम उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

हलकर्णी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्रॅम उद्घाटन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग व आजरा महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्रॅम चे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

          याप्रसंगी आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे (आजरा), प्रा डॉ.एम आर ठोंबरे, प्रा. बी एस कडवाळे, प्रा. एस बी सावंत, विभाग प्रमुख प्रा. ए एस बागवान व प्रा. ए एस जाधव मान्यवर उपस्थित होते.                        प्रास्ताविक प्रा.ए एस बागवान यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली स्वागत प्राचार्य डॉ. बि. डी. अजळकर, प्रा. ए. एस. जाधव यांनी केले. यावेळी आजरा महाविद्यालय मार्फत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत आजरा महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. ए एन ठोंबरे, प्रा. बी एस कडवाळे व प्रा. एस बी सावंत यांनी मनोगते व्यक्त करताना अभ्यासक्रमावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी बीएससी चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होते. सूत्रसंचालन  व आभार डॉ. टी एम वांद्रे यांनी मानले. यावेळी सी ए पाटील बागडी पी एन ,आर एम पवार, ज्योतिबा पवार, संजय कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment