पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्यानिमित्त कलानंदीगड येथे भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून गड स्वच्छता मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्यानिमित्त कलानंदीगड येथे भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून गड स्वच्छता मोहीम

गड स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेले भाजपा कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून संपन्न करण्यात येत आहे. त्याचा एक भाग गड स्वच्छता मोहीम चंदगड तालुक्यातील कलानंदीगड या किल्यावर जाऊन भाजपा कार्यकत्यानी केली. यावेळी त्यांच्यासोबत गेली सहा वर्षे किल्यावर स्वच्छता करणारे चंदगड तालुक्यातील दुर्गवीर उपस्थित होते. 

       यावेळी भरमूआण्णा म्हणाले शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या किल्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. या किल्याचा पर्यटनस्थळ होणेच्या दृष्टीने नक्कीच शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. देशात व राज्यात भाजपा सरकार आहे. याचा नक्कीच चंदगड तालुक्यातील विकासासाठी उपयोग होईल यात शंका नाही. 

          प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केले. नामदेव पाटील व अशोक कदम यांनी मनोगत व्यक्त केली. अमर नाईक, अनिल शिवणगेकर (संयोजक सेवा पंधरवडा) अशोक कदम (तालुकाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा चंदगड),  नामदेव पाटील (तालुकाध्यक्ष भाजपा चंदगड), शांताराम पाटील (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा),  अंकुश गवस (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा), प्रताप सूर्यवंशी (सरचिटणीस चंदगड मंडल), दिलीप पाटील, श्रीपती पाटील, पंकज तेलंग, विशाल बल्लाळ, सतीश पाटील लक्ष्मण यादव (सदस्य भाजपा) रामचंद्र पाटील नामदेव पाटील, कृष्णा सुपल (दुर्गवीर मोहीम प्रमुख) सर्व दुर्गवीर उपस्थित होते. संदिप पाटील (गड संवर्धन प्रमुख चंदगड) यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment