तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
विनाकारण एका नामांकित माध्यमिक शाळा परिसरात कर्नकर्षक हॉर्नचा आवाज करत दूचाकी गाडया फिरवून हूल्लडबाजी करणाऱ्या कॉलेज यूवकावर चंदगड पोलिसांनी कारवाई करून या यूवकांना चांगलाच धडा शिकवला.
चंदगड तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका माध्यमिक विद्यालय परिसरात काही युवकांचा विनाकारण वावर चालू असल्याची माहिती पाटणे फाटा पोलिस चौकितील पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही कॉलेज युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. विना परवाना, विना कागदपत्रे दूचाकी वापरल्याबद्दल दंड ठोठावून या हुल्लडबाज तरूणांची चांगलीच कानऊघडणी केली. माफीनामा घेऊन मग या यूवकांना सोडून देण्यात आले. या पूढेही अचानक अशी कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment