कोवाड महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एम. एस. पवार यांची नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

कोवाड महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एम. एस. पवार यांची नियुक्ती

 

प्राचार्या डॉ. एम. एस. पवार

तेऊरवाडी / सी.एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. माधवी संजीव पवार यांची नुकतीच विद्यापीठाकडून निवड   झाली आहे.

        या निमित्ताने महाविद्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव एम. व्ही. पाटील होते. यावेळी  प्रा. एन. एस. पाटील (संचालक), एम. जे. पाटील (संचालक) उपस्थित होते.  प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. त्यानंतर संस्था सचिव एम. व्ही. पाटील यांचे हस्ते पुष्प गुच्छ  देऊन  नूतन  प्राचार्या डॉ. एम. एस. पवार यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

           पदभार स्विकारल्या नंतर प्राचार्या डॉ. एम. एस. पवार म्हणाल्या, ``सर्व घटकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच संस्थेचा लाौकिक  वृद्धिगंत करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले'. यावेळी एम. व्ही. पाटील, प्रा. एन. एस. पाटील यांनीही मनोगते व्यक्त केले. यावेळी एस. एम. फर्नांडिस, बी. के. पाटील, प्रा. व्ही. आर. पाटील, जोतिबा वांद्रे, याकूब मुल्ला आदि संचालक तसेच सर्व विद्याशाखांचे प्रमुख प्राद्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी वृंद  उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक पाटील यांनी तर आभार प्रा. आर. टी. पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment