कौलगे येथील वत्कृत्व स्पर्धामध्ये सांगलीचा शिवम माळकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

कौलगे येथील वत्कृत्व स्पर्धामध्ये सांगलीचा शिवम माळकर प्रथम

वत्कृत्व  स्पर्धामधील विजेते स्पर्धक डाविकडून  शिवम, यश व प्रज्ञा

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

             श्री अष्टविनायक कला, क्रीडा व संस्कृती संवर्धन मंडळ आणि स्कॉडर लीडर सदानंद शहापूरकर सार्वजनिक ग्रंथालय कौलगे (ता. गडहिंग्लज) यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सांगलीच्या शिवम माळकर याने प्रथम क्रमांक मिळवला.

          वत्कृत्व स्पर्धा ही गाव मर्यादित आणि राज्यस्तरीय खुला गट अशा दोन विभागात घेण्यात आली. गाव मर्यादित वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर राज्यस्तरीय खुला गट यामध्ये एकूण २३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. गाव मर्यादित स्पर्धेमध्ये प्रेरणा भुजंग, जयदीप गाडीवड्ड, शिवानी देसाई, शंभूराजे देसाई यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय खुल्या गटामध्ये शिवम माळकर (सांगली), यश पाटील (मुंबई), प्रज्ञा माळकर (सांगली), अपूर्वा पाटील (हेब्बाळ जल) यांनी नंबर मिळविले. 

          या वकृत्व स्पर्धेसाठी नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, नांदेड, राधानगरी, चंदगड इथून स्पर्धक सहभागी झाले होते. गाव मर्यादित वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा अश्विनी पाटील व गंगुबाई पन्हाळकर यांनी परीक्षण केले तर खुल्या गटासाठी दत्ता देशपांडे व प्रा. सुभाष कोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

          ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये गणपतराव डोंगरे, डॉ. अमोल पाटील, संजय कुपेकर, शंकर केसरकर, अजित वडर, महेश शेट्टी, शिवाजी जाधव, जयवंत चव्हाण, सोनल पाटील, बाळासाहेब देसाई, रामचंद्र पोवार, आनंदराव देसाई, कृष्णा पाटील, बाबुराव पाटील, नंदकुमार पाटील, अरविंद देसाई, कृष्णा पोवार, श्रीकांत चव्हाण, विजयकुमार देसाई, बाबुराव देसाई, सुरेश डोंगरे यांनी योगदान दिले.

No comments:

Post a Comment