विज्ञान प्रदर्शनात दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडने मांडलेत्या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2022

विज्ञान प्रदर्शनात दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडने मांडलेत्या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे येथे ४९ व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात दि न्यू इंग्लिश स्कूल ने मांडलेत्या उपकरणाची  जिल्हास्तरावर निवड झाली आहे. माध्यमिक गटात विद्यार्थी उपकरणामध्ये  प्रथम क्रमांक पटकावला. स्मार्ट सिटी हे उपकरण मांडले होते.

प्राथमिक गटात इको फ्रेंडली व्हीलेज या उपक्रमास द्वितीय क्रमांक मिळाला. तर विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर मधु तेजम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये कु. आशिष पाटील, कार्तिक निट्टूरकर, आदर्श गावडे, चिराग दुगाणी, उत्कर्ष कुंभार, विशाल मांगले, युवराज हळवणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

         या विद्यार्थ्याना विज्ञान शिक्षक टी. एस. चांदेकर, टी. टी. बेरडे, बी. आर. चिगरे, वर्षा पाटील, सूरज तुपारे, पुष्पा सुतार, विद्या शिदे यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य एन. डी. देवळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment