![]() |
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मुलांना फळांचे महत्व सांगताना फादर विल्सन पॉल |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपलं आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. आरोग्यम् धनसंपदा असे म्हटले जाते. आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याची जपणूक करण्यासाठी सर्वांनी सकस आहार, फळे यांचा नित्यनिहमीत आहारात वापर करावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी केले. ते फळे खा, निरोगी रहा... या आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करताना बोलत होते.
![]() |
इयत्ता पहिलीच्या वर्गात फळ महोत्सवानिमित्त दुपारच्या जेवणाच्या वेळी वर्गामध्ये फळे उंचावून दाखविताना विद्यार्थ्यी सोबत वर्गशिक्षका |
आहारात एक तरी फळ असावे, फळ खाल्ल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो, शरीरास ऊर्जा मिळते, जीवनसत्व मिळते, सकस आहारामुळे आपणही निरोगी राहतो. मुख्याध्यापक विल्सन पॉल यांच्या हाकेला विद्यार्थ्यांनी होकार देत वेगवेगळी फळे आणून दुपारच्या जेवणामध्ये त्याचा आस्वाद घेतला. नियमितपणे आपण आहारात फळाचा वापर करणार असल्याचे आश्वासन ही दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी फळांचे फायदे काढलेली चित्रे व चित्रीकरण करून भिंतीपत्रक ही सजवले होते.
सध्याचे युग हे धावपळीचे युग आहे. विद्यार्थी शाळा करत अनेक जादा क्लासेस करून संध्याकाळी उशिरा घरी जातात. आई-वडील ही आपल्या कामात व्यस्त असल्याने अनेकदा मुलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे मुले शरीराने कमजोर होत चालली आहेत. या बाबींचा विचार करून सकस आहार आपल्या उत्तम निरोगी पणाचे लक्षण आहेत.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू, मोसंबी सिताफळ, रामफळ अशी अनेक फळे घेऊन एकत्र त्याचा आस्वाद घेतला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment