कानुर बुद्रुक येथील भावेश्वरी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अहवाल वाचन करताना व्यवस्थापक संजय आगाशे. |
कानुर / सी. एल. वृत्तसेवा
कानूर बुद्रूक (ता. चंदगड) येथील भावेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक शिरोडकर होते. स्वागत मॅनेजर संजय आगाशे यांनी केले. यावेळी शहीद जवान, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कोरोना संसगाने मृत्यू झालेल्या व पतसंस्थेचे कायदेशीर सल्लागार कै. हणमंतराव गणपती देसाई या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच संस्थेला अहवाल सालात ५ लाख १३ हजार निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना १० टक्के लाभांश देण्याच्या ठरावास मंजुरी मिळाली. वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रके वाचन मॅनेजर संजय आगाशे यांनी केले. विषय पत्रिकेवर चर्चा झाली. त्यानंतर मॅनेजर संजय आगाशे यांनी सभासदांना पोट नियम दुरुस्ती व नवीन शाखा मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्याला सर्व सभासदांनी मंजुरी दर्शविली.
शाखा पाटणे फाट्यावर करण्यासाठी संस्थेचे सभासद पंडित हंबेरकर, गुंडू सुतार, पांडुरंग सुखये, रामू गावडे, शिवाजी गायकवाड, सीताराम झेंडे, सागर बाचीकर, वामन चौगले, दाजीबा भगत, कृष्णा यादव, कृष्णा नाईक, भिकु गावडे, नामदेव गावडे आदींनी ठरावाला मंजुरी दिली. पतसंस्थेची इमारत बांधकामाबद्दल पतसंस्थेचे सभासद सागर बाचिकर, नारायण पाटील, प्रदीप गुरव यांनी संचालकांशी बांधकामासाठी चर्चा केली.
यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मॅनेजर संजय आगाशे यांनी दिले. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक नामदेव मोरे, अशोक आगाशे, भीमाना मोरे, सागर मटकर, गणपती गुरव, तुकाराम मोहीते, लक्ष्मण केरकर, तुकाराम गुरव, गोविंद फाटक, सरस्वती गणाचारी, चंद्रकांत नाईक कर्मचारी विक्रम कोंडुसकर, शुभांगी देसाई, निवृत्ती गुरव, रमेश खोत आदी उपस्थित होते. आभार चेअरमन अशोक शिरोडकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment