"लंम्पी" आजाराच्या पार्श्वभूमीवर तुर्केवाडी व अडकुर येथील आठवडी बाजार बंद,वाहनातून जनावरांची वहातूक करू नये - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2022

"लंम्पी" आजाराच्या पार्श्वभूमीवर तुर्केवाडी व अडकुर येथील आठवडी बाजार बंद,वाहनातून जनावरांची वहातूक करू नये

 


चंदगड/प्रतिनिधी :-- 

       देशात सध्या  'लंम्पी' या  आजारामुळे हजारो जनावर मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी चंदगड तालुक्यात दर बुधवारी भरणारा तुर्केवाडी आणि अडकुर येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद राहणार आहे. तरी शेतकरी, व्यापारी यांनी दखल घेवून कोणत्याही प्रकारची जनावरांची वाहतूक करू नये असे आदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 

     सध्या जनावरांवर 'लंम्पी' या आजराचा प्रादुर्भाव राज्यभर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन या आजाराचे बळी ठरतं आहेत. त्यापासून सावध राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जनावरांची  बाजारासठी वहानातून वाहतूक करू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.वहानातून जनावरांची वहातूक करण्या‐या वाहनावर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment