पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड येथे शनिवारी रक्तदान शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2022

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड येथे शनिवारी रक्तदान शिबिरकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि. १७/०९/२०२२ रोजी चंदगड तालुका भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

        कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालणार असून या कामी अर्पण ब्लड बँक कोल्हापूर व कोवाड महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे. चंदगड तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. तसेच तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सकाळी १० पूर्वी शिबिर स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने करण्यात येत आहे.No comments:

Post a Comment