कालकुंद्रीत २ रोजी विविध गटात मुला- मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

कालकुंद्रीत २ रोजी विविध गटात मुला- मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्धाकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने रविवार २ ऑक्टोबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ व १७ वर्षाखालील मुले व खुला गट मुले तसेच खुल्या गटातील मुली अशा विविध गटात होणाऱ्या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत.

           स्पर्धेसाठी बक्षीसे अनुक्रमे पुढील प्रमाणे १४ वर्षाखालील मुले (२ किमी धावणे) रोख रुपये- ७०१,५०१, ३०१, २५१, २०१. १७ वर्षाखालील मुले (४ किमी धावणे) गटासाठी रोख रु. ३००१, २००१, १५०१, १००१, ५०१. खुला गट मुले (६ किमी धावणे) रोख  रु. ५००१, ३००१, २००१, १००१, ५०१. खुला गट मुली (३ किमी धावणे) रोख रु. २००१,   १५०१, १००१, ७०१ व ५०१ अशी बक्षीसे असून सर्व गटातील अनुक्रमे पहिल्या सात क्रमांकांना गौरव चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी येताना मूळ आधार कार्ड आणणे बंधनकारक असून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment