नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गा दौडचे औचित्य! छ. शिवरायांना रांगोळीतून अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

नवरात्रौत्सवानिमित्त दुर्गा दौडचे औचित्य! छ. शिवरायांना रांगोळीतून अभिवादन

रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रेखाटलेली छत्रपती शिवरायांची आवेशपुर्ण भावमुद्रा


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          नवरात्रौत्सव, दुर्गा दौडीचे औचित्य साधत वडगाव- बेळगाव येथील रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी छत्रपती शिवरायांना रांगोळीतून अभिवादन केले आहे.

        औरवाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळीतून आवेशपूर्ण छवी आणि सुवर्ण राजमुद्रा रेखाटली आहे. २ बाय ३ फूट आकाराची रांगोळी  रेखाटण्यासाठी त्यांना १२ तास लागले. दुर्गादौडीतील धारकरी, भाविक, शिवप्रेमी व कलाप्रेमी नागरिकांसाठी पर्वणी ठरणारी ही रांगोळी ३० सप्टेंबर पासून ५ ऑक्टोबर २०२२ (विजयादशमी) पर्यंत रोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ज्योती स्टुडिओ, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, वडगाव- बेळगाव येथे पाहण्यासाठी खुली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन औरवाडकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. अजित औरवाडकर यांनी यापूर्वी अनेक देशभक्त, क्रांतिकारक, संत, कलाकार, नेते, ऐतिहासिक महापुरुष, राष्ट्रीय व धार्मिक सणांचे औचित्य साधून टाकलेल्या विविध प्रकारच्या रांगोळ्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. शिवरायांच्या या रांगोळीनिमित्त त्यांचे बेळगाव शहर व परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment