कालकुंद्री विद्यालयाचे NMMS शिष्यवृत्तीत यश - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2022

कालकुंद्री विद्यालयाचे NMMS शिष्यवृत्तीत यश

कु आयुषा महेशकुमार पाटील, राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री (ता. चंदगड) हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
      शाळेची कु. आयुषा महेशकुमार पाटील ही राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली असून सारथी शिष्यवृत्तीसाठी अथर्व प्रताप पाटील, कु तनश्री विक्रम पाटील, कु संजीवनी कल्लाप्पा बागीलगेकर, कु समृद्धी रामराव पाटील, कु ऋतुजा राजेंद्र पाटील, कु ऋतुजा रवींद्र बम्बर्गेकर, कु काजल विजय कोकितकर, कु श्रावणी परशराम कडोलकर, कु संजीवनी नागोजी पाटील, सुबोध रणजीत पाटील, कु जिज्ञासा जोतिबा पाटील, श्रीजय चंद्रकांत जोशी आदी विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

  राष्ट्रीय व सारथी शिष्यवृत्ती धारकांना चार वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


No comments:

Post a Comment