25 बैल भरून जाणारा कंटेनर चंदगड पोलिसांकडून जप्त! कुठे झाली कारवाई? वाचा सविस्तर वृत्त! - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2022

25 बैल भरून जाणारा कंटेनर चंदगड पोलिसांकडून जप्त! कुठे झाली कारवाई? वाचा सविस्तर वृत्त!

बेळगाव : कोळीकोप्प येथील गो-शाळेमध्ये बैल जमा करताना पत्र देताना पीएसआय सत्याप्पा नाईक, आनंदराव देसाई.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातून  चंदगड मार्गे बेळगावच्या दिशेने  25 बैल घेऊन पूर्णतः बंद कंटेनरवर कारवाई करून चंदगड पोलिसांनी कंटेनरसह 25 बैल जप्त केले. सदर कारवाई वेंगुर्ला मार्गावर पाटणे फाटा येथे रविवारी मध्यरात्री झाली.  संबंधितावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकाराचा अधिक तपास सुरू आहे.  घटनास्थळावरून कंटेनर चालक व वाहक अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी कंटेनरसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर बैल बुधवारी बेळगाव येथे विधानसौध जवळील कोळीकोप्प येथील गोशाळेमध्ये सुपूर्द केले. लम्पी या रोगाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जनावरे वाहतुकीस बंदी घातली आहे. त्या बंदी आदेशाद्वारे सदर कारवाई करण्यात आली.   सिंधुदुर्ग मधून जनावरे भरून सदर कंटेनर अंधाराचा फायदा घेत चंदगड मार्गे बेळगावला जात असल्याचा संशय चंदगड पोलिसांना आला होता. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चंदगड पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, आनंदराव देसाई, अमर सायेकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.  बेकायदा वाहतूक करून जनावरे कत्तलखान्याकडे नेत असून कडक कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर व चंदगड तालुका अध्यक्ष महांतेश देसाई यांनी चंदगड पोलिसांकडे केली आहे. 




No comments:

Post a Comment