राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - एस. एन. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2022

राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - एस. एन. पाटील

जंत नाशक मोहिमेची माहिती देताना एस. एन. पाटील.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        सोमवार 10 ऑक्टोंबर  2022 रोजी चंदगड तालुक्यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक मोहीमेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी हि मोहिम अंत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे चंदगड तालूक्यातील सर्व विद्यार्थ्यानी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री शिवशक्ती हाय. व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथील विज्ञान विषय अध्यापक एस. एन. पाटीत यांनी केले.
             जंतनाशक मोहिमेनिमित्य अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते. तर आरोग्य सहाय्यक एम. के. गुळवणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
         यावेळी सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीची सविस्तर माहिती देवून गोळ्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला बंकट हिशेबकर, आर. डी. पाटील, एस. डी. पाटील, एस. एन. पाडले, आय. वाय. गावडे आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment