आईच्या स्मृतीप्रित्यर्थ डुक्करवाडी येथील १७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2022

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ डुक्करवाडी येथील १७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना ढेरे कुटुबीय.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी (रामपूर) येथील कै. गुणवंता विठोबा ढेरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य आर. व्ही. ढेरे पुंडलिक विठोबा ढेरे यांनी प्राथमिक शाळा ९५ व हायस्कूलमधील ८० अशा एकूण १७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. मुख्याध्यापक एस. एस. तुर्केवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली वह्या, ड्रॉइंग वही, पट्टी, पेन्सिल, खोडरबर कंपास किट, अंकलिपी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

        प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राजेंद्र शिवणगेकर यांनी केले. मुख्याध्यापक तुर्केवाडकर यांनी यावेळी आई वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वायफळ खर्च करण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करून ढेरे कुंटूबियानी चांगला सामाजिक संदेश दिला. हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा चिंचणगी, अनंत पाटील, भैरू पाखरे, एम. एन. शिवनगेकर, विलास नाईक, पार्थ ढेरे, दयानंद गावडे, सौ. जे. एम. मजुकर, सौ. व्हि. एन. मुंगारे आदीसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.No comments:

Post a Comment