चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
फाटकवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत केएलई,प्रभाकर कोरे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर बेळगाव मार्फत आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सहभागी विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल व रंगपेटी तसेच शाळेसाठी पृथ्वीगोल व धन्वंतरीची मूर्ती भेट दिली. हॉस्पिटलचे कॅम्प को- ऑरडिनेटर दीपक अरबळी यानी मुलांना स्वच्छता आणि आरोग्याविषयी माहिती दिली. या हिंडगाव गावचे सरपंच सौ.पुनम फाटक,उपसरपंच विनायक खांडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन दळवी, सामाजिक कार्यकर्ते माणिक देशपांडे, संजय भातकांडे, केएलई स्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संदिप गावडे, आरोग्य मित्र सुनिल शिंदे, रोहित पाटील, सुनिल वायदंडे, दिपक बचनेट्टी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment