पाटणे फाटा येथे स्वामी ट्रेडींग टेक्निकल स्टडी सेंटरच्या दुसऱ्या शाखेचा रविवारी शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2022

पाटणे फाटा येथे स्वामी ट्रेडींग टेक्निकल स्टडी सेंटरच्या दुसऱ्या शाखेचा रविवारी शुभारंभ

पाटणे फाटा येथील शाखा.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड शाखेच्या १५ बॅचेसच्या यशानंतर स्वामी ट्रेडिंग टेक्नीकल स्टडी सेंटरची दुसरी शाखा पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सुरू करत असल्याची माहीती सेंटरचे संस्थापक संचालक संतोष घवाळे यांनी दिली. पाटणे फाटा येथे रविवारी (ता. ९) दुपारी १ वाजता श्री गणेश फर्निचरच्या बाजूला, बेळगाव वेंगुर्ले रोड, पाटणे फाटा येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.

         भाजपचे कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला पो. नि. संतोष घोळवे, माजी सभापती शांताराम पाटील, माजी प्राचार्य जे. बी. पाटील, उद्योजक लक्ष्मण गावडे, कारवेचे सरपंच शिवाजी तुपारे, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, अरुण पिळणकर, सौ. मनीषा शिवणगेकर, बापूसाहेब घवाळे, शंकरराव मनवाडकर, धनाजी पाटील, जी. व्ही. दैठणकर, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. परशराम गावडे, सुरेश हरेर, रमेश हुद्दार, दस्तगीर उस्ताद, एस. टी. कांबळे, संतू कांबळे, एन. व्ही. पाटील, गोविंद पाटील, बाबू परीट,  राजू जोशी, ए. के. पाटील, विनायक प्रधान, महादेव वाणेकर, सुभाष चौगुले, ए. पी. देवाण, डॉ. पी. एल. भादवणकर, वसंत जोशीलकर, शिवाजी पाटील, सदानंद पाटील, आनंदा कांबळे, एल. एन. गायकवाड, प्रशांत पाटील, शि. ल. होणगेकर, रियाज शेख, प्रकाश वोकड़े, शाहू पाटील, बळवंत लोडे, युवराज कागणकर, अशोक नौकुडकर, सौ. माधुरी कागणकर, अनिल पाटील, बसवराज वाडकर, रवी माने, अश्विनी कांबळे, राहुल गावडे, जोतीबा पाटील, सौ. शुभांगी मुरकुटे, लक्ष्मण लाळगे, रामदास बिर्जे, ईश्वर पाटील, अनिल चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक संतोष घवाळे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment