कालकुंद्री मॅरेथॉन स्पर्धेत ३०० धावपटूंचा थरारक सहभाग..! विवेक मोरे, हर्षद कदम, सृष्टी रेडेकर, अर्जुन पाटील यांची विविध गटात बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2022

कालकुंद्री मॅरेथॉन स्पर्धेत ३०० धावपटूंचा थरारक सहभाग..! विवेक मोरे, हर्षद कदम, सृष्टी रेडेकर, अर्जुन पाटील यांची विविध गटात बाजी

कालकुंद्री मॅरेथॉन स्पर्धा २०२२ मधील थरारक क्षण.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             कालकुंद्री (ता. चंदगड) येथे २ ऑक्टोबर २०२२ रोजी संपन्न झालेल्या श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या विविध गटात तब्बल ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. कालकुंद्री मॅरेथॉनचे यंदा दुसरे वर्ष आहे. धावपटू विवेक मोरे, हर्षद कदम, सृष्टी रेडेकर, अर्जुन पाटील यांनी आपापल्या गटात बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. चारही गटातील अनुक्रमे सात विजेत्यांना रोख बक्षीसे व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन गावातील माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.


             स्पर्धेतील विजेते धावपटू अनुक्रमे पुढीलप्रमाणे 

           पुरुष खुला गट- विवेक मोरे (दाटे), परशराम भोई (भडगांव), ओंकार राजेंद्र पन्हाळकर, (इचलकरंजी), प्रधान विलास किरुलकर (राधानगरी), अरूण माळवी (महागाव), लगमाना जरळी( दिंडलकोप), शुभम पाटील (कालकुंद्री). 

         खुला गट मुली- सृष्टी श्रीधर रेडेकर (नेसरी), रोहिणी लक्ष्मण पाटील (राधानगरी),  ऋतुजा विजय पाटील (नेसरी), भक्ती सुनील पोटे (महागाव), राधिका कल्लापा बागिलगेकर (कालकुंद्री),  प्रेरणा पुंडलिक जोशी (कालकुंद्री), प्राची लक्ष्मण राजगोळकर.

          १७ वर्षाखालील मुले गट - हर्षद बळवंत कदम (राधानगरी), रोहित धनाजी आडावकर (वडरगे), प्रथम पांडुरंग पाटील (कालकुंद्री), सुहास मारूती रायकर (राधानगरी), प्रतिक हणमंत पाटील (कोल्हापूर), आलोक सचिन रेडेकर, अमित अंकुश धुरी (चंदगड).

            १४ वर्षांखालील मुले गटात अर्जुन तानाजी पाटील, युवराज विश्वनाथ जोशी (कालकुंद्री), फाल्गुन गणपती पाटील,  संकेत दशरथ मोरे (राजगोळी खुर्द), आदित्य जयवंत खळनेकर, अनिकेत दशरथ मोरे (राजगोळी खुर्द), आदित्य राजेंद्र पाटील (कोवाड) यांनी बाजी मारली.

            स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी विनोद पाटील, एस के मुर्डेकर, मारुती पाटील, विजय पाटील, शरद जोशी, विष्णू पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक मारुती वर्पे, शिवाजी वरपे, सुनील पाटील यांचे सह श्रीकांत वैजनाथ पाटील, के जे पाटील, अर्जुन मुतकेकर, अर्जुन पांडुरंग पाटील आदींचा विविध पुरस्कारांबद्दल सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुखदेव भातकांडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, निशांत पाटील, ऋतिक पाटील, समिर मोमीन सह कलमेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment