दौलतच्या कामगारांवर गुन्हे दाखल, कामगार व प्रशासनात बोनसवरून झाला होता वाद - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2022

दौलतच्या कामगारांवर गुन्हे दाखल, कामगार व प्रशासनात बोनसवरून झाला होता वाद


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व - दौलत कारखान्यातील कामगारांत बोनस व शिफ्टनुसार हजर होण्याच्या कारणावरून सोमवारी सकाळी कामगार व प्रशासनात मोठा वाद  झाला. यावरून यातील प्रमुख सोळा जणांसह अन्य दोनशेहे ते दोनशेहे पन्नास जणांवर प्रशासनाकडून चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पांडुरंग सरवदे यांनी फिर्याद दिली आहे 
फिर्यादीमध्ये म्हटले आहे की सरवदे हे गेटमधून आत जात असताना त्यांना कोणीतरी पाठीमागून मारले व त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये व विशाल नागाप्पा पाटील यांच्याकडील १० हजार ५०० रुपये कोणीतरी काढून घेतले आहेत . या दोघांसह आशीष गायकवाड , तुकाराम आवडण , आबासो देसाई यांनाही मारहाण केली आहे , तर मेन गेटजवळील ऑफिसमधील संगणक व इतर साहित्याची मोडतोड करून पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान केले आहे . चेअरमन मानसिंग खोराटे व त्यांचा मुलगा पृथ्वी खोराटे बसलेल्या ठिकाणी वरील संशयित आरोपींनी काचांवर दगडफेक करून काचा फोडल्या आहेत . त्यातील एक दगड खोराटे यांच्या पाठीत लागला आहे , तर सरवदे यांना तुला खातेप्रमुख केले तरी तू कंपनीला मिळलास , अशा शिव्या दिल्या आहेत.श्री सरवदे यांच्या तक्रारीवरून महादेव फाटक ,अशोक गावडे,अशोक  चांदेकर , मलाप्पा केसरकर , संजय विठल देसाई , रामलिंग  पाटील , निवृत्ती  पाटील , झेलू गावडे , दत्तात्रय मोहिते , सुधाकर पवार , महंतेश कणगली , संजय हजगोळकर सहदेव पाटील,सुरेश पाटील,केदारी पाटील यांच्यासह जमावातील इतर २०० ते २५० कामगारावर चंदगड पोलिसात गन्हा दाखल झाला आहे.


No comments:

Post a Comment