स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १३० वर्षे पुर्ण, त्यानिमित्त रविवारी व सोमवारी कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १३० वर्षे पुर्ण, त्यानिमित्त रविवारी व सोमवारी कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी विवेकानंद

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते. त्या निमित्ताने रविवार  दि. १६ ऑक्टोबर रोजी स्वामीजींनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्ली येथील  स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

       सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत विवेकानंद स्मारकाला भेट देऊन स्वामीजींचा आशीर्वाद व प्रसाद घ्यावा असे आवाहन रामकृष्ण मिशन  वतीने करण्यात आले आहे.

     विवेकानंद स्मारकात स्वामीजींनी बेळगाव वास्तव्यात वापरलेला खाट,आरसा आणि लाठी देखील जतन करून ठेवण्यात आली आहे.स्वामीजींच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन देखील भेटीच्या वेळी भक्तांना पाहता येईल.

       सायंकाळी पावणे सहा ते सात या वेळेत कन्नड भजन आणि मराठी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात ते  रात्री साडे आठ या वेळेत योध्दा सन्यासी स्वामी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग पुण्याचे राष्ट्रीय कलाकार दामोदर रामदासी सादर करणार आहेत.

          रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद यांनी जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment