सकस आहार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत असून लोकांना त्यामुळे अनेक आजार जडत आहेत. त्याचे परिणाम हे मानवी आरोग्यावर होत आहेत. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनी सकस आहार घेण्याची गरज आहे. तरच आपले आरोग्य चांगले राहील व आजारांपासून लांब राहता येईल, असे प्रतिपादन डॉ. आर. आर. गोडार्ड यांनी सांगितले.
चंदगड फादर अग्नेल स्कूल चंदगड येथील सही पोषण देश रोशन "पोषणमास" या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल होते.
डॉक्टर गोडार्ड पुढे म्हणाले, ``आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून, सकस आहार सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या आहारात तेलकट, आंबट, खारट, चरबी युक्त व मसालेजन्यपदार्थ आपण टाळून रानभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, फळे, अंडी व शरीराला ऊर्जा मिळेल असे अन्न आहारात वापरले पाहिजे. सकस आहाराचा वापर नित्यनिहमाने करावा व आपले आरोग्य जपावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावारून बोलताना फादर विल्सन पॉल यांनी डॉक्टर गोडार्ड यांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. त्याचबरोबर सकस आहार घेऊन आपण आपले आरोग्य जपावे अशा सूचना करून विद्यार्थ्यानीं आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगी स्वच्छता बाळगावी आपला परिसर स्वच्छ व नेटका ठेवावा या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पाककला करून सकस आहाराची गरज का आहे? याच्या चित्रफिती तयार करून भिंतीपत्रकावर लावल्या होत्या. यावेळी नाचना, जोंधळा, सावा, मांडग, शेंगदाणा चपाती पुरणपोळी नाचना आंबील मका भाकरी अशा नाना प्रकारचे अनेक हेल्दी फूड तयार करून आणले होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
No comments:
Post a Comment