वाचन प्रेरणा दिनानिमित्त दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृत्तपत्र विक्रेता दिवस उपक्रमाला उदंड प्रतिसाद, वृत्तपत्र विकणाऱ्या मुलांचा गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

वाचन प्रेरणा दिनानिमित्त दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृत्तपत्र विक्रेता दिवस उपक्रमाला उदंड प्रतिसाद, वृत्तपत्र विकणाऱ्या मुलांचा गौरव

वृत्तपत्र विक्रेता दिवस उपक्रम

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता म्हणून साजरा करण्यात आला.

       प्रभारी प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. व्ही. कानूरकर यांनी केले. "शालेय जीवनापासून मुलांना वाचनाची सवय लागावी तसेच कमवा व शिका याचे स्वावलंबी शिक्षणाचे महत्व लक्षात येण्यासाठी वाचन प्रेरणा दिन प्रत्येक शाळेत राबविणे काळाची गरज आहे. " असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य एन.डी. देवळे यांनी केले.

       "माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्र वाटप करून आयुष्याची सुरुवात करून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.आजच्या मुलांना श्रमाचे महत्व जाणून घेण्यासाठी ' वाचन प्रेरणा ' दिन महत्वाचा आहे असे प्रतिपादन टी. एस. चांदेकर यांनी केले. 

       यावेळी कु. कावेरी चांदेकर, निधी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. ग्रंथपाल शरद हदगल यांनी यावेळी ग्रंथप्रदर्शन मांडले. विद्यार्थानी विविध वृत्तपत्रांचे वाचन केले. यावेळी विद्यालयातील सिद्धार्थ देसाई, कैफ मदार, जियान काझी, आयाननेसरीकर ,इलियास नाईक, आयान वाडीकर,मदार या वृत्तपत्र विकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

          कार्यक्रमाला बी.आर.चिगरे, व्ही. के. गावडे, सूरज तुपारे, शरद हदगल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार डी. जी. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment