केरवडे ते आसगोळी रस्त्याचा आम. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, मुख्यमंत्री सडक योजनेतून ३ कोटी २० लाखांचा निधी - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

केरवडे ते आसगोळी रस्त्याचा आम. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, मुख्यमंत्री सडक योजनेतून ३ कोटी २० लाखांचा निधी

                               केरवडे ते आसगोळी रस्ताचा आम.राजेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ,

मुख्यमंत्री सडक योजनेतून ३कोटी २० लाखांचा निधी

चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

            केरवडे ते आसगोळी या बहुचर्चित रस्त्याला माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आम. राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन कोटी वीस लाख रूपये मंजूर झाले आहेत. या निधीतून हा रस्ता मजबुतीकरण,खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचा शुभारंभ आम. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी चंदगड अर्बन चे अध्यक्ष दयानंद काणेकर, बाळासाहेब बांदिवडेकर, तालुकाध्यक्ष भिकु गावडे, सुभाना धुळप उपस्थित होते. महादेव नार्वेकर, महादेव सुतार,मारुती ढोणुक्षे,अर्जुन तूपट, विठल सरनोबत, विठल गावडे,जोतिबा ढोणुक्षे,शंकर चांदेकर,नागोजी गावडे,मारुती कुट्रे, अनंत निचम,शंकर नार्वेकर, दिपक गावडे,नामदेव सरनोबत,उत्तम कांबळे, ज्ञानेश्वर वाईंगडे,अर्जुन चिमणे,दिलीप ढोणुक्षे,उत्तम पाटील आदीसह ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न केला होता.

           हा रस्ता व्हावा ही केरवडे पाटीलवाडा व आसगोळी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या रस्त्यामुळे डोंगराकडील शेतीकडे जाणे दोन्ही गावातील शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे. तसेच केरवडे-पाटीलवाडा -आसगोळी- पोरेवाडी-आमरोळी-माणगाव-कोवाड किवा पाटणे फाटा अशी रहदारी वाढणार आहे.

No comments:

Post a Comment