कोवाड महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण याविषयीं कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

कोवाड महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण याविषयीं कार्यशाळा संपन्न

नविन शैक्षणिक धोरणावर बोलताना डॉ. ए. एस. आरबोळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे न्यू इज्यूकेशन  पॉलिसीवर एक दिवशीय कार्यशाळा प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ. ए. एस. आरबोळे व डॉ. के. पी. वाघमारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितीत होते.

       प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. स्वागतपर मनोगतात कार्यशाळेचा हेतू प्रा. मुकेश कांबळे यांनी स्पष्ट केला. प्रमुख वक्ते डॉ. ए. एस.आरबोळे यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि आजची शिक्षण पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. के. पी. वाघमारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थांची गुणवता आणि वेगवेगळे झालेले बदल याबाबत सखोल मार्गर्दशन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी न्यू इज्युकेशन पॉलिशी ही वेगवेगळ्या नव्या संकल्पना स्विकारण्याचे आवाहन केले. आभार डॉ. मुकेश कांबळे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले.

      यावेळी प्रा. एस. जे. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. बी. एस. पाटील, प्रा. आर. टी. पाटील, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. काळे के. एस., डॉ. एस. बी. पाटील, डॉ. दळवी व्ही. के., प्रा. दीपक पाटील, विलास शेटजी, दयानंद पाटील, मारुती बिर्जे आदी सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आय क्यू ए सी विभागाने केले होते.

No comments:

Post a Comment