विवेक पाटील यांना निवडीचे पत्र प्रदान करताना पुंडलिकराव जाधव, जयराज लांडगे, नागेश चौगुले, राजू दिंडोर्ले आदी. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. कोवाड (ता. चंदगड) येथील विवेक विठ्ठलराव पाटील (चिक्कू) यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.
निवडीचे पत्र मनसे चे नेते पुंडलिकराव जाधव, संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते विवेक पाटील यांना नुकतेच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, परिवहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार, पुंडलिक पवार आदींची उपस्थिती होती. विवेक पाटील यांनी गेल्या काही वर्षात मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. त्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडावे. अशा प्रकारची सदिच्छा निवड पत्र प्रदान प्रसंगी व्यक्त करण्यात आली. या निवडीचे चंदगड मधील मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
यावेळी विवेक पाटील (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्यासह पुढील पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली, विवेक मनगुतकर (कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष), अमर कांबळे (ता. अध्यक्ष चंदगड), अविनाश पाटील (ता.उपाध्यक्ष चंदगड), सतीश भोसले (ता.उपाध्यक्ष चंदगड), तुकाराम पाटील (ता.सचिव चंदगड), शुभम कालेलकर (शहर अध्यक्ष, चंदगड), सौं. राजनंदिनी सावंत (महिला जिल्हा सचिव ), अशोक पाटील (तालुका अध्यक्ष भुदरगड ), कृष्णा लोंढे (उपतालुका अध्यक्ष कागल)
No comments:
Post a Comment