चंदगड तालुक्यातील हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करावा – ब्लॅक पॅन्थरच्या वतीने तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2022

चंदगड तालुक्यातील हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करावा – ब्लॅक पॅन्थरच्या वतीने तहसिलदारांना निवेदन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       गेल्या अनेक दिवसापासून जांबरे, उमगांव, माळी, नागवे यासह तालुक्यातील अनेक गावात हत्ती व गवी रेडयांनी धुमाकुळ घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके फस्त करीत आहे. सध्या जांबरे भागात हतीचा कळप आल्याने शेतकन्यांचा ऊस, भात, नाचणा, भुईमुग यासह अनेक पिकांची मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. हत्तींचा कळप व गवी रेडे राजरोस सदर भागात हैदोस घालत असून देखील वन विभाग व त्यांचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ब्लॅक पॅन्थरच्या वतीने शुक्रवारी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

 निवेदनात म्हटले आहे की, वन विभागाकडून तात्पुरती सहानभूती मिळत असली तरी वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागा कोणतीच ठोस पावले उचलत नाहीत. त्यामुळे सदर वन विभागावर कारवाई करावी, चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांची समस्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय केला जात नसल्याने शेतकऱ्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने हत्तींच्या व गव्या रेडयांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना पिकांचे झालेले नुकसान त्वरीत द्यावे, अन्यया ब्लैक पैंथर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा तहसिलदारांना यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर  ब्लॅक पॅन्थरचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, विष्णू कांबळे, संजय पाटील, गोविंद गिरी, गणपत कांबळे, वैजनाथ कांबळे, सुधाकर कांबळे, शिवाजी कांबळे यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment