चंदगड येथील श्री रवळनाथ गणेशोत्सव मंडळाने जपली सामाजीक बांधिलकी, सुळये येथील माने कुटुंबियांना दिपावलीनिमित्त ५ हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2022

चंदगड येथील श्री रवळनाथ गणेशोत्सव मंडळाने जपली सामाजीक बांधिलकी, सुळये येथील माने कुटुंबियांना दिपावलीनिमित्त ५ हजारांची मदत

सुळय़े (ता. चंदगड) येथील माने कुटुंबियांना मदत देताना चंदगड येथील श्री रवळनाथ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा                              

        श्री रवळनाथ सार्वजिनिक गणेशोत्सव मंडळ, रवळनाथ गल्ली चंदगड यांच्या कडून सुळये (ता. चंदगड) येथील कै. नागोजी धोंडिबा माने यांच्या कुटुंबीयांना रोख ५००० हजार रुपयांची आर्थिक व जीवनावश्यक वस्तु स्वरूपात दिवाळी निमित्त मदत देण्यात आली. 

          समाजाच आपण काहीतरी देणं लागतंय हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मंडळाने आपली सहकार्याची परंपरा जपली आहे. त्यांचे हे कार्य प्रत्येक मंडळासाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे. 

        सुळये गावातील कै. नागोजी धोंडिबा माने यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाची जाणीव ठेवून दीपावलीच्या सणासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कौटुंबिक साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत केली. माने कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करताना रवळनाथ मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment