लंपी स्किन रोगाचा चंदगड तालुक्यात शिरकाव? खबरदारी घ्या...! पशुसंवर्धन विभागाचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2022

लंपी स्किन रोगाचा चंदगड तालुक्यात शिरकाव? खबरदारी घ्या...! पशुसंवर्धन विभागाचे आवाहन


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       गाय, बैल वर्गीय प्राण्यांसाठी प्राणघातक ठरणारा लंपी स्कीन रोग चंदगड तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील पशुपालकांनी याची गंभीर दखल घ्यावी. लसीकरणापासून वंचित असलेल्या जनावरांना तात्काळ लसीकरण करावे, गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करून जनावरांचे सर्व गोठे स्वच्छ ठेवावे, योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन पशुवैद्यकीय विभागामार्फत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कुट्रे यांनी केले आहे.

        करंजगाव (ता. चंदगड) येथील शंकर सावंत यांचा बैल आजारी असल्याचे समजताच डॉक्टर कुट्रे यांनी संबंधित गोठ्याला भेट दिली. बैलाची तपासणी केली असता त्याला लंपी स्किन आजाराची लागण झाली असल्याचे दिसून आले. राज्यासह कर्नाटकातील बेळगाव सीमा भागात थैमान घातलेल्या गोधनावरील या आजारामुळे शेकडो जनावरे दगावली आहेत. तथापि चंदगड तालुक्यात आजपर्यंत हा आजार आढळून आला नव्हता पण प्रत्यक्षात तालुक्यात शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांनी उर्वरित जनावरांना तात्काळ लसीकरण करून घेण्यासह खबरदारी घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे. आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने तालुक्यातील पशुपालकांत भितिचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment