दौलतचे कामगार 'बोनस'च्या मागणीवरून झाले संतप्त, गेट तोडून अथर्व कंपनीच्या काही कामगारांशी हाणामारी - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2022

दौलतचे कामगार 'बोनस'च्या मागणीवरून झाले संतप्त, गेट तोडून अथर्व कंपनीच्या काही कामगारांशी हाणामारी



चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलतच्या कामगाराना संपकाळातील ३५ दिवस व त्यानंतर ३५दिवस असे एकूण ७०दिवसापैकी पक्त ७ दिवसाचा पगार मिळाला. त्यामुळे या मिळालेल्या पगारात दिवाळीसाठी घरात किती पैसे द्यायचे व गाड्यांच्या पेट्रोल साठी किती पैसे वापरायचे असा प्रश्न कामगारासमोर उपस्थित झाला आहे‌ त्यामुळे कामगारांनी बोनसची मागणी अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांच्या कडे केली. मात्र खोराटे यानी कामगारांची मागणी फेटाळल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. सन २०२२-२३ सालातील गळीत हंगामातील पहील्याच दिवसी हलकर्णी  ६५० संतप्त कामगारांनी गेट तोडून अथर्व कंपनीच्या काही  कामगारांना बेदम मारहाण करीत अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे व संचालक पृथ्वीराज खोराटे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. 
     गेल्याच महिन्यात आपल्या प्रलंबित मागण्यासाठी  कामगारांनी तब्बल ३५ दिवस बेमुदत संप केला होता.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कामगारांचा प्रश्न निकाली काढला होता. मात्र त्याचे पालन अध्यक्ष खोराटे यांनी पाळला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. संपकाळातील ३५ दिवस त्यानंतर ३५ दिवस असे एकूण ७०दिवसापैकी पक्त ७ दिवसाचा पगार मिळाला,त्यामुळे या मिळालेल्या पगारात दिवाळीसाठी घरात किती पैसे द्यायचे व गाड्यांच्या पेट्रोल साठी किती पैसे वापरायचे असा प्रश्न कामगारासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे कामगारानी बोनसची मागणी अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांच्या कडे केली.मात्र खोराटे यानी कामगारांची मागणी फेटाळल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. २०२२-२३ सालातील गळीत हंगामाचा पहिलाच दिवस असल्याने पहाटे ४ वाजता बॉयलर पेटवण्यासाठी तयारी सुरू झाली होती. मात्र शिफ्ट नुसार कामगार कामावर हजर झाले नाहीत. सकाळी ९ च्या दरम्यान कामगार कामावर जाण्यासाठी जात असतानाच मुख्य  गेट बंद करण्यात आले. यावेळी कामगार आणि सुरक्षा रक्षक यांच्यात मोठा वाद झाला आणि संतप्त कामगारांनी गेट तोडून कारखान्यात प्रवेश केला. मात्र  या दोघांच्या भांडणात ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास साडेतीनशे पेक्षाही अधिक ऊस भरलेली वाहने अड्ड्यात थांबली होती. वाहतुकदारांनीही कामगारांना पाठींबा देत सामील झाले. यामध्ये तहसीलदार विनोद रनवरे, उपविभागीय पोलिस अधीक्षक महामुनी, पो. नि. संतोष घोळवे, सिटू कामगार संघटना अध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, प्रा.आबासाहेब देसाई, कामगार संघटना अध्यक्ष प्रदीप पवार, गणेश फाटक, अशोक गावडे, अनिल होडगे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे,नारायण फाटक आदींनी कारखाना प्रशासनाबरोबर बोलणी केली. मात्र यश आले नाही. कामगार आपल्या भूमिकेवर, आणि प्रशासन आपल्या मतांशी शेवटपर्यंत ठाम राहिल्याने रात्री ९ वाजेपर्यंत निर्णय झाला नाही. दंगा आटोक्यात येत नसल्याने राखीव पोलीस दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली.
     
संपानंतर कामगारांच्या बहुतांश मागण्या अथर्व कंपनीने मान्य केल्या आहेत. ५० टक्के पगारवाढ केल्याने दरमहा तब्बल ५ कोटींचा फटका बसत आहे. तरीही आम्ही कामगारांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत, मात्र काही मोजकेच कामगार कारखाना सुरूच होऊ नये म्हणून विघ्न आणत आहेत, मात्र शेतकऱ्यांचे  नुकसान होऊ देणार नाही. कारखाना सुरू होण्यापूर्वी आधी दोन दिवस ऊस तोडणी करणे आवश्यक असते असे मानसिंग खोराटे यांनी सांगितले. 

कारखान्याच्या मिलचे काम अपुरे असतांना अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी थेट गळीत हंगामाला सुरुवात केलीच कशी? असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार खोराटे करत असल्याचा आरोप  कामगार अध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला.




No comments:

Post a Comment