अलबादेवी (ता. चंदगड) येथे मार्गदर्शन करताना माधुरी सावंत भोसले, शेजारी श्रीकांत नेवगे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महिलना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटांचा मोठा आधार आहे. बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून महिलांचे सक्षमीकरण करुया असे प्रतिपादन उत्साळी गावच्या सरपंच माधुरी सांवत भोसले यांनी केले. त्या अलबादेवी (ता. चंदगड) येथे झालेल्या बचत गटाच्या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा देवळी होत्या. याप्रसंगी हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीकांत नेवगे प्रास्ताविकात म्हणाले की 'व्यक्ती तितक्या प्रकृती' प्रत्येकाचे विचार वेगवेगळे विचारांची योग्य सांगड घातल्यास गावच्या विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
बचत गट समन्वयक शितल परिट (चंदगड) न्यू हायस्कूल मुख्याध्यापिका सुंनदा बागे यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या महिलांच्या झिम्मा-फुगडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपसरपंच राजाराम पाडले, तंटामुक्त अध्यक्ष धोंडिबा घोळसे, श्रीकांत नेवगे, ग्रा. प. सदस्य बसाप्पा सुतार, रघुनाथ कोले, गुरुनाथ देवळी, परशराम चौकुळकर, शशिकांत दोरुगडे, तानाजी कोंडूसकर, मनोहर कोले, सुधा डांगे, सुनिता पाटील, शितल घोळसे, समीक्षा इंगवले, रेखा पाटील, अनिता गोते, सुवर्णा दोरुगडे, शांता गोते, सुनिता पाडले, पार्वती सुर्यवंशी यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आभार ग्रामसेवीका सौ. वळवी यांनी मांडले.
No comments:
Post a Comment