चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वरगाव पैकी बेरडवाडा (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत भारताचे दिवंगत राष्ट्रपती, थोर शास्ञज्ञ डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिन व 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बाबुराव जोतिबा वरपे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक नागनाथ आडसुळे यानी करून जीवनात वाचनाचे महत्व 'वाचाल तर वाचाल' इतके असलेचे सांगितले. यावेळी विजयकुमार दळवी लिखीत 'माणसातली माणसं ' हे पुस्तक भेट स्वरुपात शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिकांना देवून वाचनासाठी प्रेरित केले. सुमारे ५००० रू किमतीची पुस्तके यानिमित्ताने देणेत आली. वि. मं. मजरे जट्टेवाडी येथेही 'वाचन प्रेरणा' दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देणेत आले.अध्यापक विलास सुतार उपस्थित होते. आभार सौ. मनिषा कांबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment