माणगाव येथील श्री माणकेश्वर बोर्डींगच्या सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2022

माणगाव येथील श्री माणकेश्वर बोर्डींगच्या सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रम

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगांव (ता. चंदगड) संचलित श्री माणकेश्वर बोर्डींग माणगांवाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहसचिव पी. वाय. पाटील होते.

   यावेळी बोर्डिंगचे अधिक्षक एम. एम. धामणेकर यानी उपस्थितांचे  स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ठ केला. पी.वाय पाटील , एस.डी पाटील , गुंडू शिवनगेकर , पत्रकार एस.के पाटील यानी सामाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देवून या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला  किरण पाटील, व्ही.जी. गणाचारी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. आर. कांबळे यानी केले . आभार गुंडू शिवनगेकर यानी मानले.

No comments:

Post a Comment