चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकुर (ता. चंदगड) येथील शिवशक्ती हायस्कूल मध्ये आठवी ते दहावीत शिकणार्या १९८७ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी ३५ वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय पाडले, आर. बी. पाटील, अशोक पाटील, संतोष सरदेसाई, अशोक घोरपडे, संजय शिंदे, कृष्णा सुतार, रमेश पाटील, वसंत मुसळे, मनोज रावराणे, डाॅ. विजयकुमार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या वर्ग मित्रांच्या वतीने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तसेच अडचणीत असलेल्या व्यक्तींना मानसिक आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षण घेताना आलेले अनुभवकथन अनेकांनी केले. यावेळी उपस्थित शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून करण्यात आला. विद्यार्थ्यांचाही त्यांच्या कुटुंबासह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. यावेळी वर्गमित्रांतर्फे शाळेला भेटवस्तू देण्यात आली. या मेळाव्याला सुरेश वाईंगडे, वसंत निकम, अशोक पाटील,बाळू रेडेकर, मष्णू बेर्डे, सयाजी सुतार, राजाराम देसाई, बाबू गुडवळेकर मोतीराम मळेकर, बाबू घोळसे या सह ३५ विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक आर. बी. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संजय पाडले यांनी तर आभार संतोष सरदेसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment