चंदगड शहरातच मिटर टेस्टींगची सोय व्हावी, शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2022

चंदगड शहरातच मिटर टेस्टींगची सोय व्हावी, शेतकऱ्यांची मागणी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विद्युत मिटर टेस्टींग ची सोय पूर्ववत ३ नोव्हेंबर पुरवी चंदगड येथेच करावी अन्यथा ४ नोव्हेंबर पासुन चंदगड येथे उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब हळदणकर व शेतकऱ्यांनी दिला. याबाबतचे निवेदन विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता याना देण्यात आले आहे.

      चंदगड येथेच पूर्ववत मिटर टेस्टींग ची सोय करावी अशी मागणी ११/०७/२०२२ रोजी  निवेदनाद्वारे विद्युत वितरण कंपनीकडे केली होती. त्याची अद्याप  कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोल्हापूर डिव्हीजन ऑफीस, गडहिंग्लज उप विभाग  या ठिकाणी वारंवार  चौकशी केली असता अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. चंदगड तालुका हा दुर्गम भाग असल्यामुळे येथून जनतेला मिटर टेस्टींगसाठी गडहिंग्लज येथे जावे लागत आहे, यासाठी पैसा व वेळ खर्ची पडत आहे. पुर्वी मिटर टेस्टींग ही चंदगड येथेच करणेत येत होती. परंतु ऑफीसच्या मनमानी कारभारामुळे येथील मिटर टेस्टींग गडहिंग्लज येथे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून जनतेला तेथे वेळेत जाणे शक्य होत नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मिटर टेस्टींग चंदगड येथेच करणेत यावे. दि. ३ नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडून कोणतीही कार्यवाही नाही झालेस दि. ४ नोव्हेंबर २०२२ पासून चंदगड येथे उपोषण करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आले. यावेळी शरद गावडे, सिताराम नाईक, कलीम मदार, हनिफ सय्यद, बाबू नाईक, जयवंत नाईक, दिगंबर कोरे, नविद अत्तार, सुरेश जावडेकर, मुन्नासो मुल्ला, बाबुराव गावडे, सदानंद शिंदे, विजय गोवेकर, आकाश गोंधळी, नारायण शेलार, टेणु पठाण, मेजर गावडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment