कोदाळीत हत्तींचा धुमाकूळ, भातशेतीचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2022

कोदाळीत हत्तींचा धुमाकूळ, भातशेतीचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

कोदाळी येथे धानू आप्पा गावडे यांच्या भातशेतीचे हत्तीनी केलेले नुकसान

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालूक्यातीत कोदाळी येथे हत्तीच्या कळपाने धानू आप्पा गावडे यांच्या कापनिला आलेल्या भातशेतीचे प्रचंड नुकसान केले.

       रात्री कोदाळी - तिलारी नगर मार्गालगत असणाऱ्या भात शेतीत हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला. यावेळी कापनिला  आलेले भात मोठ्या प्रमाणात उध्वस्थ झाले. याबरोबरच केळीची झाडेही हत्तीनी पाडून टाकली. वनविभागाला याची माहिती मिळताच या परिसराकडे वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या नुकसानग्रस्थ शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज असून हत्तींचाही बंदोबस्त वनविभागाने करणे महत्त्वाचे आहे.


No comments:

Post a Comment