सुळये येथील प्रस्तावित जागेतच नळपाणी योजना राबवावी - ग्रामस्थांची मागणी, गटविकास अधिकारी यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2022

सुळये येथील प्रस्तावित जागेतच नळपाणी योजना राबवावी - ग्रामस्थांची मागणी, गटविकास अधिकारी यांना निवेदन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          आसगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुळये (ता. चंदगड) येथील नविन नळपाणी योजना प्रस्तावित देवालयाजवळील जागेतच राबवावी अशी मागणी सुळये ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

      सुळये गावासाठी केंद्र शासनाकडून पिण्याच्या पाण्याची नळ पाणी योजना मंजूर झाली आहे . ती योजना गावी नं करता आसगाव येथे विहीर खुदाई करून ग्रामपंचायतीद्वारे दोन्ही गावांना पाणी पुरवठा करणार आहे.  भूजल अधिकारी दि. १४/१०/२०२२ रोजी सुळये येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी त्यांना यापूर्वी श्रमदानातून खुदाई केलेली विहीर दाखवली. या विहीरीला पाणी आहे पण में महिन्यात पाणी कमी पडते. त्यामुळे ज्या ठिकाणी वर्षभर जिवंत झऱे आहेत त्याजागी विहीर विहीर मारल्यास पाणी कमीच पडणार नाही अशी खात्री दिली.  त्यावेळी सुळये येथे विहीर मारून नळ पाणी योजना करायचे ठरले होते. 

           मात्र नवीन पाणी योजनेतील विहीरीसाठी जागा आसगाव येथील स्मशानभूमी येथे दाखवली आहे व तेथून ते आसगाव व सुळये या दोन्ही गावांना पाणी देणार आहेत. परंतु आसगाव येथे ज्या ठिकाणी विहीर मारण्याचे प्रस्तावित  आहे. तेथे सभोवती अगोदरच विहिरी आहेत. एप्रिल नंतर त्या विहिरींना पाणीच नसते त्यामुळे तेथे पाण्याचा साठा होणार नाही. दोन्ही गावांना पाणी मिळणार नाही. या गावांना हि नळपाणी योजना संयुक्तिक व लाभदायी होणार नाही. शिवाय नंतर या योजनेचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हि ग्रामपंचायतीस परवडणार नाही. 

          सुळये येथे एकूण लोकसंखेच्या ५०% लोकसंख्या मागासवर्गीयांची आहे. त्यामुळे सुळये गावासाठी जी विहीर (पाणी योजना) प्रस्तावित केली आहे. त्या आसगाव विहिरीतून न करता त्याऐवजी सुळये येथे आम्हाला १००% खात्री असलेल्या सुळये येथील देवालयाजवळ जागेमध्ये विहीर मारून त्यावर नळ पाणी पुरवठा योजना राबवावी. अन्यथा आमचे गाव १००% पाण्यापासून वंचित राहील व शासनाचा खर्च वाया जाणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी योजना राबविणारे संबंधित अधिकारी राहतील. त्यामुळे सुळये येथेच विहीर खुदाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर बंडु गावडे, गोविंद देशमुख, रमेश गावडे, विनायक गुरव, महेश रेडेकर, शामराव कांबळे, बाळु कांबळे, विठोबा कांबळे यांच्यासह तीसहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




No comments:

Post a Comment