हलकर्णी कॉलेजचा अनिकेत सुतार रांगोळीत प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

हलकर्णी कॉलेजचा अनिकेत सुतार रांगोळीत प्रथमचंदगड / प्रतिनिधी
      आटपाडी येथे मध्यवर्ती युवा महोत्सवात सहभागी झालेल्या रांगोळी स्पर्धेत हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत सुतार बी.ए.भाग -१ यांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले.
 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सव आटपाडी येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये सुमारे १०० हून अधिक स्पर्धक रांगोळीत सहभागी झाले होते.यात सुतार यांनी काढलेल्या  शाहू महाराज यांच्या रांगोळीने हे यश मिळविले.
या यशाबद्दल विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतीक विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले तर सदस्य प्रा. अनंत कलजी,सौ. वंदना केळकर,  प्रा. ए.एस.बागवान डॉ.एम. व्हीं.जाधव,प्रा. व्हि.डी पाटील,प्रा. सुवर्णा पाटील, मनोहर कांबळे यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment