तावरेवाडी येथे हरिपाठ स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

तावरेवाडी येथे हरिपाठ स्पर्धा संपन्न

 


चंदगड / प्रतिनिधी

  दीपावली निमित्त तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री मंगाईदेवी महिला हरिपाठ मंडळ , मंगाईदेवी मंदिर समीती व कै. संभाजी कागणकर सार्वजनिक वाचनालय यांचे संयुक्त विद्यमानाने महिला हरिपाठ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी ह. भ. प.कीर्तनकार संजय पाटील व मृदुंग सेवक सखाराम पवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर नारायण गडकरी, निवृत्ती हरकारे, अमित वरपे, संदीप पाटील सरपंच माधुरी कागणकर, ग्रामपंचायत सदस्य आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धामध्ये बागीलगे येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानेश्वर सांप्रदायिक महिला बाल हरिपाठ मंडळ दुडगे द्वितीय, तृतीय क्रमांक भावेश्वरी महिला निट्टूर तर भावेश्वरी बसर्गे ,ज्ञानोबा तुकाराम हरिपाठ मंडळ कोवाड, बाल हरिपाठ मंडळ गोळ्याळी ता. खानापूर, ज्योतिर्लिंग हरिपाठ निट्टूर,या मंडळांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आली. तर वैयक्तीक उत्कृष्ट पखवाज वादक माऊली हरिपाठ मंडळ कोवाड, उत्कृष्ट गायक बाल हरिपाठ मंडळ बागीलगे, शिस्तबद्ध संघ म्हणून ज्योतिर्लिंग हरिपाठ मंडळ धुमडेवाडी या संघांचा समावेश आहे.
No comments:

Post a Comment