सह्याद्री प्रतिष्ठान चंदगड कडून किल्ला स्पर्धा परिक्षण, लवकरच निकाल जाहिर होणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

सह्याद्री प्रतिष्ठान चंदगड कडून किल्ला स्पर्धा परिक्षण, लवकरच निकाल जाहिर होणार

 

किल्यांचे परिक्षण करताना सह्याद्री प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख, दुर्गसेवक व किल्ला बांधलेले दुर्गप्रेमी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सह्याद्री प्रतिष्ठान चंदगड कडून आयोजित केलेल्या चंदगड तालुका स्तरीय किल्ला स्पर्धेतील  किल्यांचे परिक्षणाचे काम सह्याद्री प्रतिष्ठान कडून करण्यात आले. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहिर करून त्याचे बक्षिस वितरण पारगड किल्यावर करण्यात  येणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठान चंदगड चे संपर्क प्रमूख पंकज कोकितकर यानी सी. एल. न्यूजशी बोलताना दिली.
   या प्रतिष्ठान तर्फे चंदगड तालूका स्तरीय किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात ऑनलाईन किल्ला व्हीडीओ जमा करण्यात आले. चंदगड तालूक्यातून शंभरहून अधिक व्हीडीओ पाठवण्यात आले. या सर्वांचे ऑन लाईन परिक्षण करून यातील टॉप १० किल्ले निवडून त्यांचे विविध अंगी प्रत्यक्ष भेट देवून परिक्षण करण्यात येत आहे. हे परिक्षण पंकज कोकितकर (संपर्क प्रमुख चंदगड तालूका) मयूर पाटील (दुर्गसेवक) प्रविण पाटील (दुर्गसेवक ) अजित गुरव (दुर्गसेवक) यांच्या कडून करण्यात आले. यातील विजेत्या ना पारगड  येथेबक्षिस देवून गौरविण्यात येणार आहे. दुर्ग संरक्षणासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या या सह्याद्री प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.       

No comments:

Post a Comment