किल्ला स्पर्धेत मराठा वॉरियर्स तेऊरवाडीचा जंजिरा किल्ला प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

किल्ला स्पर्धेत मराठा वॉरियर्स तेऊरवाडीचा जंजिरा किल्ला प्रथम

किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रसंगी रामराव गुडाजी, सरपंच सौ. सुगंधा कुंभार व मान्यवर
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील रामराव गुडाजी यांच्या तिरंगा स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेत मराठा वॉरियर्स जूना वाडा बाल मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला.
मराठा वॉरियर्सने साकारलेला मुरुड जंजिरा किल्ला

     अतिशय सुंदर अशी मुरूड जंजिरा किल्याची हुबेहूब प्रतिमा या बालचमूनी साकारलेली आहे. प्लास्टीकचा वापर टाळून निव्वळ मातीचा किल्ला तो पण पाण्यामध्ये उभारण्यात आला आहे. या किल्यावर राजवाडा, बालेकिल्ला, राम पंचायत, मशिद, सुरल खानाचा महाल, शिव मंदिर, दर्या दरवाजा, कबर, शिलालेख, होड्या अशा सर्व प्रतिकृती सुंदर रित्या साकारल्या आहेत. या साठी गेले आठवडाभर विकास पाटील, प्रणव पाटील, विद्याधिश कुंभार, कस्तूरी भिंगुडे, प्रतिक्षा पाटील, साई भिंगुडे, मयंक पाटील, ओंकार पाटील, प्रथमेश कुंभार, स्वप्नील पाटील, सोहम पाटील, सिताराम पाटील, विघ्नेश पाटील, संदेश कुंभार, आदिनथ पाटील, संकेत पाटील या सर्वानी अथक परिश्रम घेतले. किल्या विस्तृत माहिती विकास पाटील यांनी दिली तर शिव भक्त गित गायन कस्तूरी व प्रतिक्षा हिने केले.
यशस्वी स्पर्धकांन रामराव गुडाजी, सरपंच सौ. सुगंधा कुंभार, माजी सरपंच सौ. शर्मिला पाटील, सैनिक अमोल पाटील, डॉ राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, अजित पाटील आदि मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.


No comments:

Post a Comment