हेरे सरंजाम प्रश्न सोडविण्यासाठी आमरण उपोषणकर्त्यांच्या रेट्याला यश, १६ हजार एक हेक्टर जमिनीचे होणार शेतकरी मालक, ५५ गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2022

हेरे सरंजाम प्रश्न सोडविण्यासाठी आमरण उपोषणकर्त्यांच्या रेट्याला यश, १६ हजार एक हेक्टर जमिनीचे होणार शेतकरी मालक, ५५ गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी

कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना हेरे सरंजाम बाबत  २००१ साली झालेल्या शासन आदेशाची प्रत देताना आम. राजेश पाटील, बाजूला मंडलिक, पाटील, प्रसादे, वाईगडे, फाटक, रेंगडे आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुक्यातील ५५ गावामधील हेरे सरंजाम अविभाज्य शर्त असलेली १६ हजार एक हेक्टर जमीन भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ असे ७/१२ पत्रकी जानेवारी अखेर करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी प्रातांधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिले. 

        दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी तहसिल कार्यालया समोर अन्याायग्रस्त शतकरी महादेव मंडलिक - पाटील (आमरोळी), अनिल रेंगडे, राजेंद्र कापसे (अडकुर), राजाराम वाईंगडे (आमरोळी), धोंडीबा चिमणे (वाळकोळी), रणजीत गावडे (इनाम म्हाळुंगे) यांनी आमरण उपोषण चालू केले. दि. ११/१०/२०२२ इ. रोजी आमदार राजेश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देवून सायंकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचेशी फोनवरुन चर्चा करुन हेरे सरंजाम प्रश्न सोडवितो असे आश्वासन घेऊन आंदोलनकर्त्यांचे लिंबु सरबत देऊन आमरण उपोषण मागे घेण्यास सांगीतले. त्याप्रमाणे उपोषण मागे घेतले गेले. 

       मात्र आमदार राजेश पाटील यांनी बुधवार दि. १९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व मंडल अधिकारी यांच्या समवेत बैठक घडवून आणून १६ हजार १ हेक्टर हेरे सरंजाम प्रलंबित प्रश्न पुर्णतः मार्गी लावण्यासंदर्भात कार्यवाही केली. उर्वरीत ६ हजार ११ हेक्टर जमिन बेदखल कुळांच्या कागदपत्राची शहानिशा करुन त्या देखील आकाराच्या २०० पट रक्कम भरुन भोगवटादार वर्ग -२ चे भोगवटादार वर्ग -१ करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार व मंडल अधिकारी यांना दिले. १६ हजार १ हेक्टर हेरे सरंजाम जमिनीचे कोणतेही कागदपत्र देणेचे नाही. फक्त संबंधीत खातेदाराचा एक अर्ज व २०० पट भरलेले चलन एवढेच घेणेचे आहे आणि प्रत्येक गाव चावडीवर मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी कॅम्प घेऊन जुने रेकॉर्ड तपासून जागेवरच आकाराच्या २०० पट चलन भरुन भोगवटदार वर्ग -२ चे भोगवटादार वर्ग -१ करणेचे आदेश दिले आहेत. याप्रसंगी  आम. पाटील  यांनी वचन दिल्याप्रमाणे त्यांची मध्यस्थी खुप मोलाची ठरली आहे. 

         अॅड. एस. एस. कोट यांनी कायदेशीर बाबी जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिल्या. आम. राजेश पाटील, ॲड. एस. एस. कोट उपोषणकर्ते महादेव मंडलिक - पाटील, अनिल रेंगडे, राजेंद्र कापसे, राजाराम वाईंगडे, धोंडीबा चिमणे, रणजित गावडे तसेच तालुक्यातील आलेले शेतकरी महादेव प्रसादे, विक्रम चव्हाण - पाटील, हेरेकर इनामदार सावंत भोसले, रवि नाईक, कृष्णा रेंगडे, अभय देसाई उपस्थित होते. दि. १० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलनकर्त्यांची ताकद वाढविणेकामी भाजपा चे प्रदेश सदस्य शिवाजीराव पाटील यांनी देखील हा प्रश्न सोडविणेसाठी मुुुख्यमंत्री, महसुलमंत्री यांचेकडे पाठपुरावा केलेबदल तसेेच माजीमंत्री भरमू आण्णा पाटील, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती बबन देसाई, शांताराम बापू पाटील, चंदगड तालुका वकील बार संघटना, पतसंस्था संघटना तसेच ५५ गावातील शेतकरी बांधवाचे, ज्ञात - अज्ञात सर्व जणांचे आंदोलकनकर्त्यांकडून आभार मानण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment