किणये येथील संगीत भजन स्पर्धेत माणगावचे संत तुकाराम भजनी मंडळ प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2022

किणये येथील संगीत भजन स्पर्धेत माणगावचे संत तुकाराम भजनी मंडळ प्रथम

 

संत तुकाराम भजनी मंडळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           किणये (ता. जि. बेळगाव)  येथील राजा शिव छत्रपती युवक मंडळ व संत तुकाराम भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेत माणगाव (ता. चंदगड) येथील संत तुकाराम भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. 

        या भजन मंडळात  विनायक बेनके,संतोष गोंधळी, दत्तात्रय गोंधळी यानी गायन केले तर त्याना हार्मोनियम परशराम बेनके तबल्याची साथ वैभव बेनके आणि ज्ञानेश्वर नौकुडकर यांची तर ईराप्पा मेटकरी, अनिकेत बागडी, वैजनाथ बागडी, पुंडलिक रोड, यल्लाप्पा बेनके, शंकर व्हन्याळकर यांची कोरसची साथ मिळाली. मंडळला संजय राऊत यांचे सहकार्य लाभले. या भजन स्पर्धेतून महाराष्ट्र-कर्नाटकातील एकुण ४० नामवंत भजनी मंडळानी सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment