दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा, पर्यावरण वाचविण्यासाठी विद्यार्थांचे एक पाऊल पुढे - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2022

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा, पर्यावरण वाचविण्यासाठी विद्यार्थांचे एक पाऊल पुढे

दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         पर्यावरण व प्रदुषण फक्त पाठयपुस्तकापुरते मर्यादित नसून त्याचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. प्रदुषणाचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. याची जाणीव ठेवून सृष्टीच्या नाशास कारणीभूत प्रदूषणाला आळा घालण्यांसाठी दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. फटाक्यांच्या  खर्चाला फाटा देऊन त्यांचीच पुस्तके घेण्याचा निर्धार मुलांनी केला.

      दिवाळी म्हणजे उत्साह, आनंदाचा सण. हा आनंद फटाक्यांशिवाय सुध्दा साजरा करता येऊ शकतो हेन्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. पर्यावरणप्रेमी अध्यापक संजय साबळे यांनी विद्यार्थ्याना फटाके मुक्त दिवाळीची शपत दिली.

        यावेळी मुख्याद्यापक एन. डी. देवळे, आर. पी. पाटील, टी. एस. चांदेकर, टी. व्ही. खंदाळे, व्ही. टी पाटील, जे. जी. पाटील, एम. व्ही. कानूरकर, व्ही. के. गावडे, टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, सचिन शिंदे, सूरज तुपारे, शरद हदगल, रवि कांबळे, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment