कोजिमाशि ही शिक्षकांची आदर्श मातृसंस्था - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2022

कोजिमाशि ही शिक्षकांची आदर्श मातृसंस्था - आमदार राजेश पाटील

कोजिमाशी संस्थेकडून सभासदाना दिपावली भेटवस्तू वितरण करताना आमदार राजेश पाटील

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

            कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था ही खऱ्या अर्थाने शिक्षकांची आदर्श मातृसंस्था असून सभासदांच्या हिताचा विचार करणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. विविध योजना राबविणारी ही पतसंस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली असून चांगली सेवा व शाश्वती देणारी आहे. संस्थेचा पारदर्शक व काटकसरी कारभार यामुळे संस्थेचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. सदैव सभासदांच्यासाठी विविध योजना राबवून हित जोपासणारी आदर्शवत पतसंस्था असल्याचे प्रतिपादन चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी कोजिमाशी शाखा गडहिंग्लज अंतर्गत दीपावली भेट व चिरंतन व्याज वितरण प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे शिक्षक नेते, तज्ञ संचालक दादासाहेब लाड होते.

           सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक रफिक पटेल  यांनी केले. यावेळी तज्ञ संचालक दादासाहेब लाड म्हणाले,"पतसंस्था ही सर्वसामान्य सभासदांची असून सर्वांना विश्वासात घेऊन आदर्श कारभार करणारी आहे. संस्थेच्या स्थापनेपासून सभासदांना दीपावली भेटवस्तू अखंडितपणे आजतागायत देणारी आपली कुटुंबसंस्था आहे. सभासदांना मोबाईल ॲप, कोअर बँकिंग, एटीएम सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम, पाल्यांच्या शिक्षणासाठी पाच लाखापर्यंत कर्ज, लॅपटॉप, टॅब व विमान प्रवासासाठी बिनव्याज कर्ज देणारी आदर्शवत पतसंस्था म्हणून नावलौकिकास पात्र ठरली आहे.

              कोजिमाशिचे नूतन संचालक व शाखा गडहिंग्लजचे चेअरमन सचिन शिंदे, पंचायत समिती गडहिंग्लजचे माजी उपसभापती विनोद नाईकवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. माध्यमिक पतसंस्थेच्या कै. व्ही. एस. आलुरकर सभागृहात आमदार राजेश पाटील, तज्ञ संचालक दादासाहेब लाड, संचालक निकम, संचालक सचिन शिंदे यांच्या शुभहस्ते सभासदांना दीपावली भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. विविध पुरस्कार प्राप्त गुणी सभासद शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते झाला.

           यावेळी माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन सतीश रेडेकर,जयसिंगराव चव्हाण, संजय भांदुगरे, गंगाराम शिंदे, अरविंद बार्देस्कर, दत्तात्रय परीट,डी.एस.दिवटे,डी.व्ही. चव्हाण, पंडित पाटील, शरद पाटील, विनायक नाईक, संजय देसाई, बाळासाहेब परितकर, बजरंग गरुड,शाखा सदस्य जयवंत दरेकर, किरण आमणगी, संतोष देसाई, शाखाधिकारी रणजीत पाटील यांसह विविध संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ पालेकर यांनी तर शाखा सदस्य संपत सावंत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment