गरुडझेप मंडळाचे कार्य आदर्शवत...! गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे,'गरुडझेप' कडून विद्यार्थ्यांना स्वेटर व ओळखपत्र - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2022

गरुडझेप मंडळाचे कार्य आदर्शवत...! गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे,'गरुडझेप' कडून विद्यार्थ्यांना स्वेटर व ओळखपत्रचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           सामाजिक बांधिलकीतून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर व ओळखपत्र देऊन इब्राहिमपूर ता. चंदगड येथील गरुडझेप कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने समाज व अन्य मंडळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. असे प्रतिपादन चंदगडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले. ते इब्राहिमपूर येथे गरुडझेप मंडळाकडून केंद्रीय प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वेटर व ओळखपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे उपस्थित होते.

        प्रास्ताविक केंद्रप्रमुख मोहन नाईक यांनी केले. सरपंच निळकंठ देसाई यांनी स्वागत केले यावेळी उपसरपंच तुकाराम हरेर,  मुख्याध्यापक उत्तम पाटील, साई विद्यालयाचे मुख्याध्यापक होडगे, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  एकनाथ कदम यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment