चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
ऐन दिवाळी हंगामात एसटी महामंडळाने प्रवासी तिकीट दर १० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडेवाडीमुळे प्रवाशांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्के पर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. त्या अनुषंगाने ही भाडेवाढ करण्यात आली असून ती २० ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राहील. साधी परिवर्तन बस, निम आराम, हिरकणी, शिवशाही, शयन आसनी बस यांना लागू राहील. शिवनेरी व अश्वमेघ या गाड्यांना ती लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून भाडेवाडीनुसार अधिकची रक्कम तिकीटाद्वारे घेतली जाईल. मात्र ही भाडेवाढ एसटी च्या आवडेल तिथे प्रवास, मासिक, त्रैमासिक तसेच विद्यार्थी पास यांना लागू राहणार नाही. १ नोव्हेंबर पासून भाडेवाढ कमी होऊन पूर्वीप्रमाणेच भाडे आकारले जाईल असे एसटी महामंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment